
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. “आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक मराठा बांधव त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे, तर जरांगे-पाटील यांनी हे आंदोलन शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.